News मुंबई

बस स्थानकातील स्वच्छतागृहाची इमारत धोकादायक अवस्थेत 

डोंबिवली – डोंबिवली औद्योागिक निवासी भागात राज्य परिवहन महामंडळाचे उप बसस्थानक असून या स्थानकावरुन रोज सुमारे ६५ ते ७० बसेस बाहेरगावी जातात व तेवढयाच बाहेर गावाहून येतात. या स्थानकाची वास्तू अत्यंत घाणेरडी झाली असून रंग उडाला आहे, अनेक जागी भिंतीना भेगा पडल्या आहेत. इतकेच नव्हे तर पुरुषांसाठी जे स्वच्छतागृह आहे तेही अत्यंत धोकादायक झाले असून ते केव्हाही कोसळण्याची भिती प्रवासी व्यक्त करत आहेत. डोंबिवलीहून अनेकदा प्रवाशांनी कल्याण आगाराला पत्र पाठवून तक्रार केली पण याची दखल कोणी घेण्यास तयार नाही.

डोंबिवली  पूर्वेतील बस स्थानकातून रोज पुणे, केाल्हापूर, अलिबाग, नाशिक, जळगाव, पंढरपूर, जव्हार, अशा विविध भागात प्रवासी बसेस कल्याण, विठठलवाडी भिंवडी येथून येेेेत जात असतात. यामुमळे सकाळी व संध्याकाळी खूप वर्दळ असते .या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असून पुरुषांचे जे स्वच्छतागृह आहे त्याच्या दर्शनी भागावर झाड उगवले आहे व त्या भिंतीला तडे गेल्याने काही प्लस्टर कोसळले असून भिंत एका बाजूला कलली आहे. स्वच्छतागृह धोकादायक असून यांसदर्भात कर्मचार्यानी वरिष्ठाकंडे लेखी अहवाल दिला असल्याचे सांगण्यात येते .कल्याणहून अधिकारी येतात व माप घेऊन जातात पण पुढे काहीच होत नाही अशा तक्रार करण्यात येत आहे.

बस स्थानकाच्या मागच्या बाजूला एक झोपडपटटी असून या भागातले नागरिकांनी कुंपण तोडले असून या भागातील रहिवासी येथे कचरा टाकतात यामुळे येथे कचर्याचे साम्रज्य झाले आहे. दुपारच्या वेळेस व संध्याकाळी फारशी वर्दळ नसल्याने येथे स्थानिक नागरिक दुचाकी शिकतात अशाही तक्रारी आहे. एकूणच डोंबिवली बस स्थानकाकडे कल्याण आगार प्रमुखाचे दुर्लक्ष  होताना दिसून येत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

फर्जंद चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित

मुंबई- या एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही....
Read More
post-image
आंदोलन महाराष्ट्र

रत्नागिरी शहरातील पाणीप्रश्नाचा वाद पेटला

रत्नागिरी- रत्नागिरी शहरातील पाणीप्रश्नाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. शिवसेनेने यावरून थेट भाजपला लक्ष केलं आहे. रत्नागिरी नगर परिषदेसाठी शासनाच्या नगरोत्थानमधून 64 कोटीची सुधारित...
Read More
post-image
आंदोलन महाराष्ट्र

शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई -आग्रा महामार्गावर आंदोलन

नाशिक – कांदयासह सर्वच शेती मालाला शासनाने तातडीने हमीभाव द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने आज मालेगाव जवळील उमराणे शिवारातील मुंबई – आग्रा महामार्ग रोखून...
Read More
post-image
मुंबई राजकीय

शिवसैनिकाच्या आत्महत्येचे विधानसभेत पडसाद

मुंबई- केंद्र सरकारने देशात जीएसटी करप्रणाली लागू करताना केलेल्या घिसाडघाईमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कराड येथील 32 वर्षीय सराफ व्यापारी आणि शिवसैनिक राहुल फाळके यांच्यावर आत्महत्या...
Read More
post-image
मुंबई राजकीय

राजू शेट्टी देणार युपीएला पाठिंबा ?

मुंबई- २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राजू शेट्टी हे युपीएला पाठिंबा देणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. राजू शेट्टी आणि...
Read More