बस वाहतुकीविषयी कंपनी स्थापन केल्याने सत्ताधार्‍यांच्या विरोधात सभागृहात गदारोळ – eNavakal
महाराष्ट्र

बस वाहतुकीविषयी कंपनी स्थापन केल्याने सत्ताधार्‍यांच्या विरोधात सभागृहात गदारोळ

नाशिक – शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी महापौरांनी महासभेत समिती स्थापन करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र ठराव करतांनी समितीचा न करता कंपनी स्थापन करण्याचा ठराव केल्याने संतप्त विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महासभेत प्रंचड गदारोळ केला. जाब विचारण्यासाठी संतप्त नगरसेवकांनी महापौरांच्या डायसवर धाव घेतल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. अशातच महापौरांनी महत्त्वाचे तीन विषय राखून ठेवत इतर विषयांना मंजूरी सभा गुंडाळली. दरम्यान राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून सभा मॅनेज होती असा आरोप काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी केल्याने पाटील आणि गजानन शेलार यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

मखमलाबाद येथील हरित क्षेत्र विकास, बचत गटांकडून पुरविला जाणारा पोषण आहार आणि शहर बस वाहतूक या प्रमुख तीन अतिमहत्वाच्या विषयांवर आज महासभेत चर्चा आणि निर्णय होणार होते. बस सेवा वाहतूकीविषयी मागील महासभेत महापौरांनी समिती स्थापन करणार असल्याची भूमिका स्पष्ट्र केली होती. विरोधी पक्षांनी त्याला सहमती दर्शविली होती. परंतु महापौरांनी प्रत्यक्ष ठराव करतांना मात्र समिती ऐवजी कंपनी स्थापन करण्याचा केला. यावरून महासभा सुरू होताच राष्ट्रवादी, कॉग्रेस, मनसेचे नगरसेवक संतप्त झाले. गजानन शेलार, गुरूमित बग्गा आणि मुशीर सैय्यद या चिडलेल्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या डायसवर धाव घेतली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले. अशातच महापौरांनी सभा गुडांळली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More