बळाच्या जोरावर धमक्या देणाऱ्यांपुढे झुकणे चुकीचे – अरुणा ढेरे – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

बळाच्या जोरावर धमक्या देणाऱ्यांपुढे झुकणे चुकीचे – अरुणा ढेरे

यवतमाळ – ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास सुरुवात झाली आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी मनोगत व्यक्त केले. बळाच्या जोरावर धमक्या देणाऱ्यांपुढे झुकणे चुकीचे आहे. त्यांना निमंत्रण रद्द करणे म्हणजे गंभीर चूक असल्याचे मत त्यांनी मांडले. तसेच लेखिका नयनतारा सहगल यांचे विचार जोपासणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. साहित्याशी आणि भाषेशी काडीचाही संबंध नसणारे लोक वाद निर्माण करत आहेत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या, ‘मराठी साहित्य हे जगातील सर्व साहित्यिकांसाठी खुले आहे. त्यामुळे कुणीही यावे आणि साहित्य संमेलन वेठीस धरावे हे चालणार नाही. निमंत्रणामागच्या गोष्टींना आता राजकीय रंग आला आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे ही आयोजकांची चूक असल्याचे त्यांनी ठळकपणे दाखवून दिले. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा निषेध करावा तेव्हढा कमीच आहे. त्या इथे आल्या असत्या तर त्यांचे विचार आपल्याला समजले असते. आज आपल्याकडे त्यांचे भाषण आहे परंतु त्यांनी काय काय अनुभव घेतले आहेत हे आपल्याला प्रकर्षाने जाणवले असते.’

 

 

 

 

 

 

कुणीही यावं आणि साहित्य संमेलन वेठीला धरावं हे चालणार नाही, असं म्हणत साहित्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखिका अरूणा ढेरे यांनी नयनतारा सहगल प्रकरणावर टीका केली आहे. साहित्यबाह्य प्रकरणांनी संमेलनात वाद निर्माण होणं आणि सहगल यांचं निमंत्रण होणं अत्यंत चुकीचं आहे. निमंत्रण रद्द करणं ही संयोजक मंडळींची चूक आहे असंही ढेरे यांनी म्हटलं आहे.  साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचं आहे असं परखड मत ढेरे यांनी व्यक्त केलं. झुंडीचं, धर्माचं राजकारण हे त्याजंच आहे असंही मत ढेरे यांनी व्यक्त केलं.

ज्ञानवंतांचे आवाज आज गहिरेपणाने ऐकण्याची गरज निर्माण झाली आहे. घडलेल्या प्रत्येक प्रकरणात फक्त शासन जबाबदार नसते, जगातील सर्व साहित्यिकांना मराठी साहित्याची दारं खुली आहे. आपल्याला शहाणं काम करणाऱ्या ज्ञानोपसकांची परंपरा आहे, आपल्याकडे डोंगरावएवढं काम केलेल्यांची परंपरा आहे. मात्र अशी माणसे आणि त्यांचं काम विस्मृतीत गेलं आहे असंही ढेरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. काय मोडीत निघालं आहे? काळाजी मागणी काय? याचंही भान माणसाने ठेवलं पाहिजे.

विचारवंतांनी कायम सावध राहणं गरजेचं आहे. इतिहास मोठा आहे अभिमास्पद आहे मात्र वेदनादायी आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्य महत्त्वाचं आहे माणूस आणि माणुसकी मोठी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कलावंत आणि साहित्यिकांच्याबाबतीत मृत गोष्टी गळून पडल्या पाहिजेत, जुने विचार, जुन्या जाणीवा साहित्यिकांनी झटकून टाकल्या पाहिजेत. आपल्या संवेदना कोरड्या पडू नयेत याचीही काळजीही साहित्यिकांनी घेतली पाहिजे. कोणत्याही तत्त्वज्ञानाशी साहित्यिकाची बांधिलकी नसते. साहित्यिकाशी बांधिलकी त्याच्या जगण्याशी असते. कलेच्याद्वारे येणारा मुक्ततेचा अनुभव हा कलाकाराचा ध्यास असतो असेही मत ढेरे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.

नयनतारा सहगल यांचे विचार जपायला आणि जोपासायला हवेत असेही मत अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. आपला विवेक जागृत ठेवायला हवा, सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्या इथे आल्या असत्या तर त्यांचे विचार आपल्याला समजू शकले असते. आता त्यांचे भाषण आपल्याला मिळाले आहे मात्र त्या कशाप्रकारे आवाज उठवतात, त्यांनी काय काय अनुभव घेतले आहेत? हे आपल्याला ऐकायला मिळालं असतं असंही ढेरे यांनी म्हटलं आहे.

संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे, उद्घाटिका वैशाली येडे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर नयनतारा सहगल यांना आमंत्रण नाकारल्याचा रसिकांनी निषेध नोंदवला आहे. काही रसिक नयनतारा यांचे मुखवटे घालून खुर्च्यांवर बसले आहेत. पोलीस आणि आयोजकांकडून हे मुखवटे जप्त करण्यात आले. दरम्यान लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना संमेलनाच्या उद्घाटनाचा मान देण्यात आला आहे.  आज सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाला सुरूवात करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More