बलात्कार प्रकरणी आरोपीला आज सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

बलात्कार प्रकरणी आरोपीला आज सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

मुरबाड- मुरबाड तालुक्यातील शिवळे  वडाचा पाडा  गावातील एका इसमाला लहान मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रू दंडा ची शिक्षा आणि दंड न भरल्यास पाच महीने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे .           याबाबत सविस्तर व्रुत्त असे की तालुक्यातील शिवळे  वडाचा पाडा   येथे राहणारा कृष्णा  ईसामे वय 57 ह्याने त्याच्या बाजूला राहणारी पाच वर्षाची लहान मुलगी खेळण्यास आली असता तिच्यावर बलात्कार केला . तिने कुठेही ह्या घटनेची वाच्चता करू नये म्हणून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती . परंतु मुलीने पालकांना ही घटना सांगितल्यावर त्या॑नी त्वरित मुरबाड पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली .  पोलीसानी त्वरित तातडीने आरोपीला अटक करून त्याच्यावर बलात्कार व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला होता . ही घटना 24 मार्च 2015 रोजी सदर घटना   घडली होती . कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस पी गोगरकर ह्यांच्याकडे हा खटला चालला होता . सरकारी वकील म्हणून  आश्विनी भामरे-पाटील व या केस  चे वाचन  वकिल   गणेश घोलप ह्यांनी काम पाहिले . ह्या खटल्यात नऊ साक्षीदार तपासले व न्यायाधीशांनी इसामेला पाच वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रू दंडाची शिक्षा सुनावली

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More