बलात्कारी आसाराम आत्महत्या करणार – eNavakal
गुन्हे देश

बलात्कारी आसाराम आत्महत्या करणार

परभणी – राम सोनवणे
जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आसाराम यांना ज्या ग्रहांनी उच्चस्थानी नेले व त्याच ग्रहांनी बलात्कारी आसारामला भविष्यकाळी आत्महत्या योग असल्याचे व आत्महत्या करणार असल्याची भविष्यवाणी रमल विद्याचे अभ्यासक एस. बी. बोराळकर यांनी वर्तविली आहे.
या संबंधी सविस्तर माहिती देताना बोराळकर म्हणाले की, आसाराम यांच्या जीवनात गुरू, शुक्र, रवि, चंद्र या ग्रहांनी भाग्यस्थानी व लाभस्थानी असल्याने धार्मिक कार्यात सुरूवातीपासून यशदायी केले. धार्मिक कार्यही केले. त्याचे प्रमाणही वाढविले ज्या योगे आपण फार मोठे देवाचे भक्त असून आपल्या माध्यमातून देव प्राप्त होऊ शकतो असा आभास निर्माण करीत खुपच माया जमविली. कालांतराने हेच ग्रह अशुभ व कुयोगमध्ये आले असताना त्यामध्ये शनि आणि मंगळ या ग्रहांची भर पडली ते पंचम ग्रह वाईट असतात तसेच आसाराम यांना अष्टसिद्धि देखील काही अंशामध्ये प्राप्त होती. त्यामुळे वैभव प्राप्त झाले. ज्याला आपण माया म्हणतो. माया देखील इतकी वाढली त्यात ते गुरफटून नितिमत्ता विसरले. कुकर्मात केव्हा गेले हे त्यांना कळालेले नाही. परंतू अशा वैभवामध्ये नितिमत्ता सांभाळणी ही निसर्ग धर्माची आचारसंहीता होती. परंतू वाईट ग्रहामुळे त्यांनी आपला तोल सोडून शुक्र, शनि, चंद्र या वाईट ग्रहाच्या फळा मुळे त्यामध्ये रवि ग्रहाची अवकृपा सेक्स स्कॅन्डल प्रमाण वाढले व आपली बुद्धी गहाण ठेऊन नितीमत्तेला तिलांजली दिली. ज्या ग्रहांनी वैभव प्राप्त करून दिले. तेच ग्रह वाईट स्थानामध्ये कुयोग असल्यामुळे वैभवाला फार मोठे ग्रहण लागले. वैभव गेले, ग्रहांनी जेलमध्ये पाठविले ते ही मरेपर्यंत रवि ग्रहामुळे सगळ्यातून त्यांना उठविले.
पुढील काळात मात्र पश्चाताप देवाने क्षमा करून म्हणून प्रायश्चीत्त करून पुन्हा हे ग्रहमान दुर्बूद्धीच्या माध्यमातून ज्यामध्ये शनि, मंगळ, गुरू, चंद्र हे परत भविष्य काळात कुयोग मध्ये येणार असून त्याचे अशुभ फले मिळणार आहे. ज्यामुळे प्रचंड मानसिक त्रास निर्माण होऊन त्यातुन आत्महत्याचा मार्ग करणार असल्याचे त्यांचे नियोजन असेल. आजारीपणाची सोंग घेऊन दवाखाना येथे औषधाचा जास्त डोस किंवा रस्त्यात किंवा जेलमध्ये वगैरे ठिकाणी आत्महत्या करणार आहेत व प्रशासनाने लक्ष दिले नाही, त्यांनीच मारले असावेत असा आरोपही प्रशासनावर येणार. रमल विद्याच्या ग्रहफल आधारे ही भविष्यवाणी आहे. वास्तविक पाहता एवढे वैभव, धन मिळाले लोक हिताकरीता वापरणे हे धार्मिक कार्यामध्ये येते. परंतू कुकर्मात व्यस्त असल्याने सर्वच उद्धवस्त करून टाकले आणि जेलमध्ये कायम राहण्याची शिक्षा ग्रह तेच हेच ग्रह आत्महत्ये कडे पोहचु शकतील अशी एकंदरीत भविष्यवाणी असल्याची एस.पी.बोराळकर यांनी गुरुवार दि. २६ एप्रिल रोजी दैनिक नवाकाळ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत  सांगीतले.रमल विद्येचे अभ्यासक परभणी येथील एस.बी.बोराळकर यांनी यापुर्वी देश-विदेशातील भविष्यवाणी निस्वार्ध सेवेतून करीत असून आतपर्यंत पुष्कळशी भविष्यवाणी खरी घडल्याचे पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावाही बोराळकर यांनी केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More