‘बबन’ने गाठले सिंगापूर – eNavakal
महाराष्ट्र

‘बबन’ने गाठले सिंगापूर

मुंबई – सलग चौथ्या आठवड्यातही हाऊसफुल ठरत असलेल्या आणि ‘कस्संं?… बबन म्हणेन तसं’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावणार्‍या ‘बबन’ने आता थेट सिंगापूर गाठले आहे. सिंगापूरच्या मराठी सिनेरसिकांनाही या सिनेमाचे आस्वाद घेता यावा यासाठी तेथील स्थानिक प्रेक्षकांकडून ‘बबन’च्या खास स्क्रीनिंगची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या १५ एप्रिल रोजी सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी ‘बबन’ची ही स्क्रिनिंग आयोजित केली जाणार आहे.

ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. ‘बबन’ सिनेमातील संवाद आणि गाण्यांनाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनही प्रेक्षकांच्या डोळ्यात घालत आहे. वर्षाच्या मध्यान्हात सर्वाधिक कमाई करणार्‍या मराठी सिनेमाच्या यादीत ‘बबन’चा समावेश झाला आहे. भाऊराव नानासाहेब कर्‍हाडे दिग्दर्शित ‘बबन’चा हा गावरान बाणा सिंगापूरमध्येही आपली कमाल दाखवणार हे निश्चित!

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More