बनावट नंबर कारला लावून फिरणार्‍या भाजप नगरसेवकासह दोघांवर गुन्हा – eNavakal
News महाराष्ट्र

बनावट नंबर कारला लावून फिरणार्‍या भाजप नगरसेवकासह दोघांवर गुन्हा

ठाणे- इनोव्हा कारची कायदेशीर नोंदणी न करता त्या कारला बनावट नंबरप्लेट लावून फिरणार्‍या भाजपा नगरसेवक विलास कांबळे यांच्यासह दोघांवर श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तब्बल पाच वर्षे अशा प्रकारे लोकप्रतिनिधी विलास कांबळे कार वापरत असल्याचे तक्रारीत स्पष्ट
केले आहे.

फिर्यादी बिनू वर्गीस या समाजसेवकाने ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवक विलास कांबळे आणि एकनाथ विश्वनाथ शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2013 साली सदर इनोव्हा एकनाथ शेळके रा. कल्याण, शीळ रोड, डोंबिवली यांच्याकडून विकत घेतली होती. सदर कारची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रीतसर नोंदणी करणे बंधनकारक असताना नगरसेवक कांबळे यांनी संबंधित नोंदणी केली नाही. इनोव्हा कारवर एमएच 05 बीएस 4656 अशी बनावट नंबरप्लेट लावून तब्बल पाच वर्षे राजरोसपणे गाडीचा वापर करण्यात येत होता. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना तक्रार प्राप्त झाली होती.
या तक्रारीची दखल घेऊन श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री नगरसेवक विलास कांबळे आणि एकनाथ विश्वनाथ शेळके या दोघांविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात भादंवि 420,468,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप श्रीनगर पोलिसांनी कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More