बनावट कॉल सेंटरद्वारे पाच हजार अमेरिकी नागरिकांकडून उकळले 70 कोटी – eNavakal
News देश

बनावट कॉल सेंटरद्वारे पाच हजार अमेरिकी नागरिकांकडून उकळले 70 कोटी

भोपाळ- मध्य प्रदेशातील भोपाळ येथे बनावट कॉल सेंटरद्वारे पाच हजार अमेरिकी नागरिकांकडून सुमारे 70 कोटी रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी इंद्रपुरी भागात छापा टाकून या प्रकरणातील सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबात ही माहिती उघड झाली आहे.
महंमद फरहान (19), मौर्य श्रवणकुमार (19) शुभम गीते (19), सौरव राजपूत (19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या टोळीचा मुख्य सूत्रधार आरोपी अभिषेकने दिलेल्या माहितीवरून अहमदाबादहून वत्सल दीपेशभाई गांधी (25) यालाही अटक केली. दीपेशने अभिषेकला हा डाटा उपलब्ध करून दिला होता. या तरुणांनी बनावट कॉल सेंटर स्थापन करून अमेरिकेतील लोकांना कर्जाची तडजोड करण्यासाठी जाळ्यात ओढले होते. त्यांचा एक अमेरिकेतील साथीदार नागरिकांकडून दोन ते तीन हजार डॉलर इतकी रक्कम उकळत होता. आरोपी ही रक्कम बिटकॉईन, हवाला अथवा मनिग्राममार्फत अमेरिकींकडून मिळवत होता.
अभिषेक आणि रामपालसिंह कॉल सेंटरचे मास्टर माईंड – 
अहमदाबाद येथील एका कापड व्यापार्‍याचा मुलगा अभिषेक पाठक व भोपाळचा रामपालसिंह (29) या बनावट कॉल सेंटरचे मास्टरमाइंड आहेत. हे दोघे गेल्या एक वर्षापासून कॉल सेंटर चालवत आहेत. त्याने इंजिनिअरिंगच्या अनेक विद्यार्थ्यांना नोकरीस ठेवले होते. अभिषेक 12 वी पास आहे. आरोपींनी आधुनिक सॉफ्टवेअरने अमेरिकेतील अनेक नागरिकांचे मोबाईल क्रमांक गोळा केले. 70 कोटींच्या फसवणुकीत टोळीला 20 लाखांचे कमिशन मिळाले, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

इक्वाडोरच्या गल्लीत पडली 150 प्रेते, लोक त्यांच्याजवळ जायलाही घाबरतात

क्विटो – कोरोनाच्या महामारीने जगातील 200 देशांना विळखा घातला आहे. अमेरिकेपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर या लहानशा देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. या देशातील गुयाक्विल...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More
post-image
देश

कोरोनाग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या उंचावरून उडी...
Read More
post-image
देश

तेलंगणात नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

हैदराबाद – तेलंगणा राज्यातही कोरोनाचे संकट वाढले आहे. तिथे नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी सुदैवाने गेल्या 24 तासांमध्ये एकाची मृत्यू झालेला नाही....
Read More
post-image
देश

डॉक्टरांवर हल्ला झालेल्या इंदुरमध्ये सापडले १० कोरोना रुग्ण

इंदूर – मध्य प्रदेशातील मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदुरमध्ये कोरोनाचे नवे १० रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे एक पथक या...
Read More