बदलापूरला आणखी उड्डाणपूल मंजूर – eNavakal
News जीवनावश्यक महाराष्ट्र

बदलापूरला आणखी उड्डाणपूल मंजूर

बदलापूर – बदलापूरमध्ये वाहनांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत असलेला एकमेव उडाणपूल अपुरा पडत असल्याने बेलवली विभागात नवीन उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.

उड्डाणपुलाच्या कामासाठी लवकरच निविदा निघणार आहे. या पुलासाठी साठ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरकरांना दिलेले आश्वासन पाळले असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले.

बदलापूर येथे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल अपुरा पडत असल्याने या पुलावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पश्चिमेकडील बेलवली आणि पूर्वेकडील ग्रामीण रुग्णालय या भागात नवीन उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More