बदलापूरच्या सेंट अ‍ॅन्थोनी शाळेतील एका कर्मचार्‍याला मनसे पदाधिकार्‍यांनी बदडले – eNavakal
News महाराष्ट्र

बदलापूरच्या सेंट अ‍ॅन्थोनी शाळेतील एका कर्मचार्‍याला मनसे पदाधिकार्‍यांनी बदडले

बदलापूर- बदलापूर येथील सेंट अ‍ॅन्थोनी शाळेतच एका चार वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेतील संबंधित कर्मचा-याला चोप दिला. या प्रकरणी तक्रार करुन देखील कारवाई होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. तर दुसरीकडे या कर्मचा-याला मारत असतांना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिका घेत होते.

सेंट अ‍ॅन्थोनी शाळेतील एका कर्मचा-याने चार वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अशी शंका व्यक्त करुन त्याची तक्रार करण्यात आली होती. शाळा प्रशासने त्यावर कोणतीच कार्यवाही न केल्याने मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज शाळेत मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच कर्मचा-याला बेदम मारहाण केली आहे. मनसेकडून आंदोलन होणार याची कल्पना असल्याने पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता, मात्र आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट या कर्मचार्‍याला मारहाण करीत शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार घडत असतांना बदलापूर पोलीस घटनास्थळी असतांनाही केवळ बघ्याच्या

भूमीकेत होते. या सर्व प्रकरणानंतर शाळा व्यवस्थापनाला विचारणा केली असता असा कोणताही प्रकार शाळेत घडलेला नाही. त्या संदर्भात पोलीसांनी देखील चौकशी केलेली आहे. त्यांना देखील चौकशीत काही आढळलेले नाही. तसेच या प्रकरणात पालकांनी देखील शाळेसोबत चर्चा करुन या विषयाला पूर्ण विराम दिलेला आहे.

असे असतांनाही मनसेने केलेली मारहाण केल्याबद्दल आश्यर्य व्यक्त होत आहे. .  शाळेत विद्यार्थिनीवर अतिप्रसंगचा कोणताही प्रकार घडलेला नाही. या प्रकरणात चौकशी करण्यात आलेली आहे. चौकशीत कोणताचा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो! पुण्यात पुरुषांनी वटवृक्षाला मारल्या फेऱ्या

पुणे – आज राज्यभरात वटपौर्णिमेचा उत्साह आहे. आजच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी आजच्या दिवशी...
Read More
post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More