‘बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा’ – अमिताभ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा’ – अमिताभ

नागपूर – बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या शहरातील धावपळीच्या आयुष्यापासून दूर जाऊन नागपूर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये चित्रीकरणात व्यस्त आहेत. मराठमोळ्या नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचे हे चित्रीकरण सुरू आहे. बिग बींना तेथील मोकळे वातावरण फार आवडले आहे. त्यांनी सोशल मीडियावर चित्रिकरणादरम्यानचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये ते खाटेवर झोपलेले आणि बैलगाडीमध्ये बसलेले दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे, ‘बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा; और बैल गाड़ी की सवारी का’

‘झुंड’ चित्रपटात बिग बी एका निवृत्त क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील इतर भूमिका मात्र गुलदस्त्यात आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More