बच्चे कंपनीने शोधले डोंबिवलीत १५० प्रजातींचे पक्षी – eNavakal
उपक्रम मुंबई

बच्चे कंपनीने शोधले डोंबिवलीत १५० प्रजातींचे पक्षी

डोंबिवली – इमारतींच्या जंगलामुळे जिथे आकाशाचे दर्शनही तुकड्यांमध्ये होते त्या डोंबिवलीत तब्बल दिडशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या आहेत. बच्चे कंपनीने केलेल्या परीक्षणामध्ये लालबुड्या बुलबुल, सुगरण, चिमणी, साळुंके, कावळा, शेकाट्या, साधा तुतवार, ठिपक्यांच्या तुतवार या नेहमीच्या पक्ष्यांसोबतच टोळ वाटवट्या, मोठा ठिपकेवाला गरूड, मोंतेग्यूचा भोवत्या, लाल छातीची फटाकडी, रेघेरी गळ्याची पाकोळी, लाल डोक्याचा ससाणा असे दुर्मिळ पक्षीही दृष्टीस पडले आहेत.
रोटरी क्लब डोंबिवलीत नुकतीच विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ५२ संघातील २२० स्पर्धक सहभागी झाले होते. पक्षी निरीक्षण स्पर्धेत इयत्ता सातवी ते दहावीतील ३० पेक्षा जास्त संघांनी सहभाग घेतला होता. पडले गाव, कोपर खाडी, भोपर टेकडी, गणेशघाट, हाजी मलंग गड परिसर, दिवा कचरा डेपो, साथपूल परिसरातील पक्षी निरीक्षण स्थळाला विद्याथ्र्यांनी भेटी दिल्या. यावेळी १५० पेक्षा जास्त विविध पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्षी निरीक्षण स्पर्धेत मिलिंद गणात्रा, देवल, प्रियांका, तन्मय, वृषाली या गटाच्या १५४ पक्षी प्रजाती संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. ठाणे व रायगड जिल्हा पक्षी मित्र संघटनेचे प्रशांत पाटील, हिमांशू टेंभेकर, किरण कदम, स्वप्नील कुलकर्णी, पक्षीतज्ज्ञ संजय मेंगा व सुधीर गायकवाड हे यावेळी उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More