बघा कोण ठरला बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन ? – eNavakal
मनोरंजन मुंबई

बघा कोण ठरला बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन ?

मुंबई – मराठी बिग बॉसच्या घरामध्ये विनीत भोंडे हा पहिला कॅप्टन होता. पण, आता एक आठवड्याचा कालावधी संपला असून घराचा दुसरा कॅप्टन निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बिग बॉसने घरामधील सर्व सदस्यांना एकत्र बोलावून नवीन कॅप्टनची घोषणा करण्यास सांगितले. कॅप्टन निवडण्याच्या प्रक्रियेत या आठवड्यात झालेल्या प्रार्थना यज्ञ आणि इतर टीम टास्क मध्ये ज्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले त्यांना कॅप्टन बनण्याची संधी देण्यात आली.

प्रार्थना यज्ञ या टीम टास्कमध्ये आस्ताद काळे आणि स्मिता गोंडकर यांनी उत्तम प्रकारे काम केल्यामुळे सर्वानुमते त्यांची नवीन कॅप्टन बनण्याची संधी देण्यात आली. यात सदस्यांना आस्ताद काळेने ११ मते तर स्मिता गोंडकरला ४ मते मिळाली. आस्ताद काळे बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन बनला. आता आस्ताद कॅप्टनशिप कशी निभावणार हे बघणे मनोरंजक असणार आहे.

दरम्यान, विनीत भोंडे बिग बॉस घरामध्ये चर्चेचा विषय बनला असून, घरातील बरेचसे सदस्यांना त्यांचे वागणे पटत नसल्याचे प्रेक्षकांना दिसून येत आहे. एकीकडे उषाजी विनीतला वारंवार सांगत असतात कि त्याने आपल्या बोलण्यावर आणि आवाजावर सयंम ठेवण्याची गरज आहे. हे घडत असताना विनीत भोंडेला बिग बॉसने कन्फेशन रूमध्ये बोलविण्यात आले. ज्यामध्ये बिग बॉस त्याला एक सिक्रेट टास्क देण्यात आला. टास्कनुसार विनीतला कुठल्याही चार स्पर्धकांना हे बोलण्यास तयार करायचे होते की विनीत किती चांगला कॅप्टन आहे. मात्र विनीत हा टास्क पूर्ण करण्यास अपयशी ठरला. त्यामुळे विनीत कॅप्टन बनण्याच्या शर्यतीतून बाद झाला.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More