बंडखोर काँग्रेस नेत्यांच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आमदार !  – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र राजकीय

बंडखोर काँग्रेस नेत्यांच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आमदार ! 

शहापूर – कुणबी सेना प्रमुख व काँग्रेसचे प्रदेश नेते विश्वनाथ पाटील यांनी काल आपल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत,पुढील सात दिवसात लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर करत भिवंडी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्या विरोधात बंडखोरी केली. विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादीचे शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी व्यासपीठावर उपस्थित राहत आपली भूमिका जनतेसमोर मांडली. त्यामुळे टावरे यांना विश्वनाथ पाटील यांच्या बरोबरच बरोरा यांच देखील सहकार्य मिळेल की नाही? याची साशंकता निर्माण झाल्याने काँग्रेस पक्षाचे निवडणूकपूर्वीच अवसान गळल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे .

सोमवारी शेटे सभागृह येथे विश्वनाथ पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या बैठकीत काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांच्या विरोधात घोषणा केली. सभेत जमलेल्या कार्यकर्त्यांमधून 21 जणांची कमिटी निर्माण करुन येत्या सात दिवसात लोकसभा निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत,तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव करत असल्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादी पदाधिकारी व्यासपीठावर !

कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी घेतलेल्या बैठीकाला अचानक राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा, तालुकाध्यक्ष मनोज विशे, रविशेठ पाटील हे व्यासपीठावर उपस्थित झाल्याने अनेकांच्या भुवयां उंचावल्या आहेत. आमदार बरोरा यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आमदार बरोरा यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीत आणि जिल्हा परीषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कुणबी सेना तथा काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांनी आपल्याला केलेली मदतीची जाणीव ठेवून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी येथे आलो असल्याचे जाहीर केले. अजूनही वेळ गेली नसून काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार बदली करावेत, आशी मागणी त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More