फ्लिपकार्डचे संदीप पाटील ट्रु-कॉलरच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त – eNavakal
देश

फ्लिपकार्डचे संदीप पाटील ट्रु-कॉलरच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त

नवी दिल्ली – कॉल करणार्‍या अनोळखी व्यक्तींची ओळख सांगणारे स्वदेशी अ‍ॅप ‘ट्रु-कॉलर’ने ई-कॉमर्समधील अग्रगण्य कंपनी ‘फ्लिपकार्ड’चे माजी अधिकारी संदीप पाटील यांची भारतीय व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. पाटील हे ट्रु-कॉलरच्या ग्लोबल मॅनेजमेंट टीमचा भाग असतील. ही टीम भारतात दररोज 10 दशलक्ष वापरकर्ते व्यवस्थापित करते. कंपनीकडून काल याबाबत माहिती देण्यात आली.
संदीप पाटील हे कंपनीच्या बंगळुरू कार्यालयातून काम करतील. ट्रु-कॉलरच्या व्यवसाय धोरणाचा जगभरात विस्तार करणे आणि महसूल वाढवणे हे त्यांचे मुख्य लक्ष्य असणार आहे. तसेच ते दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमधील स्थित ट्रु-कॉलरच्या टीमचे देखील निरीक्षण करतील अशी माहिती कंपनीने दिली. पाटील यांच्या अनुभवाचा ट्रु-कॉलरला खूप फायदा होईल आणि यामुळे भविष्यातील योजना लवकर पूर्ण होतील असे ट्रु-कॉलरचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सांगितले. पाटील यांनी यापूर्वी, फ्लिपकार्टमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

लढा लवकर संपवूया, संशयितांनो पुढे या- अजित पवार

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. रोज तिप्पटीने बदलणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण करतेय. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा संपवायचा असेल तर संशयितांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More