‘फोर्टचा राजा’ आगमन सोहळा रद्द करून पूरग्रस्तांना मदत – eNavakal
महाराष्ट्र

‘फोर्टचा राजा’ आगमन सोहळा रद्द करून पूरग्रस्तांना मदत

मुंबई – २ आठवड्यांनंतर घरोघरी आणि विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहे. मुंबईत गणेशोत्सव मंडळांची जय्यत तयारी सुरू झाली असून ढोल-ताशा पथकांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी वाजत-गाजत मोठ्या जल्लोषात बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे. परंतु फोर्टच्या राजाचे आगमन मात्र अतिशय साध्या पद्धतीने होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भीषण महापुरात अनेकांचे बळी गेले असून अनेकांचे संसार वाहिले आहेत. त्यामुळे फोर्टचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा आगमन सोहळा रद्द करून बाप्पाला अतिशय सध्या पद्धतीने विराजमान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ढोल ताशा पथकांचा वापर न करता त्यांचा निधी थेट पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. येत्या १८ ऑगस्टला दुपारी ३ वाजता फोर्टच्या राजाचे आगमन होणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) भारताच्या मुत्सद्देगिरीचे अपूर्व यश

जम्मू काश्मिरमधील 370कलम हटवण्याच्या विरोधात पाकिस्तानकडून जे जे प्रयत्न होत आहेत त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More