(फोटो) बिग बॉस मराठीचा ‘मराठमोळा वाडा’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

(फोटो) बिग बॉस मराठीचा ‘मराठमोळा वाडा’

मुंबई – वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय ठरलेल्या ‘बिग बॉस मराठी २’मध्ये स्पर्धक कोण असतील? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती आणि या सगळ्यावरून काल पडदा उघडला. तसेच बिग बॉसचं नवं घरं कसं असेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे पहिल्या पर्वाप्रमाणेच यावेळीदेखील बिग बॉसचं घरं हटके आणि एक नवीन थीम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहे.

बिग बॉस मराठी २ : ‘मिसेस काटेकर’सह ‘हे’ आहेत सहभागी स्पर्धक


यावेळी बिग बॉसच्या घराला भव्य दिव्य वाड्याचं स्वरुप देण्यात आलं आहे. हा सेट तब्बल १४ हजार चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये उभारण्यात आला आहे. बिग बॉस घराच्या समोर मोठ आंगण आहे. स्विमिंग पूल, झोपाळा देखील आहे ज्यावर बसून सदस्य गप्पा मारतील, आपली दु:ख, आपल्या घरच्या आठवणी सांगतील, काही विशेष योजना आखताना दिसतील.


हॉलमधील एका भिंतीवर विविध मराठी शब्दांची डिजाइन पाहायला मिळते.. आई, विद्या, शांती, योग अशा विविध शब्दांवर एक वीणासुदधा आहे


बिग बॉसच्या घरातील सगळ्यात महत्वाचा आणि महिला सदस्यांचा प्रिय असलेला भाग म्हणजे “स्वयंपाक घर”. स्वयंपाक घरामध्ये माती-तांब्याची भांडी, पाटा वरवंटा अश्या गोष्टीचा आकर्षकपणे वापर केलेला दिसून येतो.


यानंतर लिव्हिंग रूम मध्ये वापरण्यात आले रंग खूप फ्रेश आहेत, अतिशय सुंदर प्रकारे रंगांचे संयोजन केले आहे. याच सोफ्यावर बसून स्पर्धक महेश मांजरेकर यांच्याशी संवाद साधतील..


घरामध्ये असा कुठलाही भाग नाही जो नजरेआड होईल… प्रत्येक जागी भिंत नसून काचेच्या दरवज्यांचा वापर करण्यात आला आहे. मागील वर्षी मुलींच्या खोलीमधील एक बाब प्रेक्षक आणि सदस्य यांना आवडली आणि ती म्हणजे “नथ”. हा अलंकार स्त्रियांच्या अगदी जवळचा दागिना मानला जातो. मोती, पाचू आणि माणिक यांनी सुशोभित असलेली नथ आणि त्याचबरोबर मोठ्या आकाराची घुंगरूची पट्टीदेखील मुलींच्या खोलीची शोभा अजूनच वाढवणार आहे असे म्हणायला हरकत नाही.


यंदा घरामध्ये जेल देखील दाखल करण्यात आले आहे. परंतु ते जेल नसून “अडगळीची खोली” असणार आहे. आता याचा कश्यासाठी आणि काय उपयोग होईल ते लवकरच प्रेक्षकांना कळेल.


सदस्यांच्या आरोग्य आणि फिटनेसला लक्षात घेता खास व्यायाम शाळा देखील असणार आहेहॉलमधून कन्फेशन रूमकडे जाणाऱ्या मार्ग वर मोठा बाजूबंद पाहायला मिळतो.. आणि त्याच मार्गाने पुढे जाताना आजूबाजूच्या भिंतींवर मोठ मोठ्या डोळ्यांची डिझाइन पाहायला मिळते. बिग बॉसची नजर ही सतत स्पर्धकांवर असते याचंच जणू ते प्रतिक आहे.


Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना पदभार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून त्यांच्याकडे  असलेल्या अवजड उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त...
Read More