फेसबुकवर तब्बल २० कोटी बनावट खाती – eNavakal
ट्रेंडिंग देश विदेश

फेसबुकवर तब्बल २० कोटी बनावट खाती

नवी दिल्ली – भारतातच नाही तर जगभरात सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरील तब्बल २० कोटी खाती बनावट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बनावट खात्यांची समोर आलेली संख्या फेसबुकने स्वतः जाहीर केले आहे. धक्कादायक म्हणजे बनावट खात्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचे फेसबुकच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

फेसबुक या सोशल मीडियाची जगभरात सुमारे २० कोटी खाती एकतर बनावट किंवा नकली आहेत. मागील अनेक वर्षांपासून फेसबुकच्या बनावट खात्यांमध्ये भर पडत असून आता त्यांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. जगभरातील आमच्या मासिक सक्रिय यूजर्सपैकी सुमारे १० टक्के खाती बनावट असल्याचे सन २०१७च्या चौथ्या तिमाहीअंती आढळले असल्याचे फेसबुकने आपल्या वार्षिक अहवालामध्ये नमूद केले आहे. भारत, इंडोनेशिया, फिलिपाइन्स आदी देशांमधील बनावट फेसबुक खात्यांचे प्रमाण खूपच जास्त असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.

३१ डिसेंबर २०१७ रोजी फेसबुकच्या मासिक सक्रिय यूजर्सची संख्या २.१३ अब्ज होती. त्यापैकी सुमारे २० कोटी खाती बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. ३१ डिसेंबर २०१६ रोजी मासिक यूजर्सची संख्या १.८६ अब्ज होती. म्हणजेच वर्षभरात यूजर्सच्या संख्येत १४ टक्के वाढ झाली. या वाढीमध्ये भारत, इंडोनेशिया व ब्राझिल या देशांतील यूजर्सचा मोठा वाटा असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

महाराष्ट्रात विकेल ते पिकेल याधर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू- मुख्यमंत्री

मुंबई – कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत उच्च शिक्षण विभागाचे राज्यपालांपुढे सादरीकरण

मुंबई – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक...
Read More
post-image
देश

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तीन खेळाडूंना कोरोनाची लागण

नवी दिल्ली – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला या तिघांना हजर राहता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी १४ हजारपेक्षा जास्त रुग्ण, तर ३५५ मृतांची नोंद

मुंबई -राज्यात आज ९१३६ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले. राज्यभरात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपाडा इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

मुंबई – मुंबईतील नागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती...
Read More