फेसबुकवर उमर खालिदचे मोदींना आव्हान – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

फेसबुकवर उमर खालिदचे मोदींना आव्हान

नवी दिल्ली – जेएनयु घोषणाबाजी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तीन वर्षांनंतर कन्हैयाकुमार आणि उमर खालिदसह आठ जणांवर देशद्रोहाच्या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर लगेचच उमर खालिद याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर आव्हान दिले आहे. आम्ही कोर्टात निर्दोष असल्याचे सिद्ध करू पण तुम्ही राफेलप्रकरणी जीपीसी चौकशीला सामोरे जायला तयार आहात का? किंवा एखाद्या पत्रकार परिषदेला सामोरे जाणार का? असा सवाल उमर खालिदने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केला आहे.

उमर खालिदने असेही म्हटले आहे की, लोकसभेच्या निवडणुका तीन महिन्यांवर असताना 9 फेब्रुवारी 2016 रोजी नंतर तीन वर्षांच्या गाढ झोपेतून दिल्ली पोलीस, गृहमंत्रालय आणि सरकार जागे झाल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो अशा शब्दात आरोपपत्राची खिल्ली उठविली आहे. जेएनयुमधील घोषणाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने बाराशे पानांचे आरोपपत्र कालच न्यायालयात दाखल केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More