फेरीवाल्यांना विचारा की ते कृष्णकुंज बाहेरच्या हॉकर्स झोनमध्ये बसणार का?-संदीप देशपांडे  – eNavakal
मुंबई राजकीय

फेरीवाल्यांना विचारा की ते कृष्णकुंज बाहेरच्या हॉकर्स झोनमध्ये बसणार का?-संदीप देशपांडे 

मुंबई – फेरीवाला क्षेत्र यादीत कृष्णकुंजच्या आसपासच्या परिसराचा समावेश महापालिकेने केल्याचे समोर आल्यानंतर ,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसे पदाधिका-यांची बैठक बोलवली. आज सकाळी ११ वाजता सर्व पदाधिका-यांची बैठक बोलवली होती. यात काय मुद्दा मांडला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.बैठक संपल्यानंतर संदीप देशपांडेनी प्रतिक्रिया देताना पालिकेने अभ्यास न करता हा हॉकर्स झोन घोषित केला आहे,मात्र कृष्णकुंज बाहेरील हॉकर्स झोनमध्ये बसणार का हे फेरीवाल्यानाच विचारा असे इशारावजा विधान संदीप देशपांडे यांनी केले.

राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना हॉकर्स झोन आणि नियम याबाबतची प्रत दिली आणि त्याचा अभ्यास करून आपापल्या विभागात हॉकर्स झोन बाबत हरकती सूचना नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.फेरीवाला धोरणानुसार राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज घरासमोरचा आणि मागचा अशा दोन्ही रस्त्यांवर हॉकर्स झोन तयार करण्यात आला आहे. दादरमधल्या एम. बी राऊत मार्ग आणि केळूसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी १० अशा एकूण  २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे.

परंतु ,सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नसताना येथे हॉकर्स झोन तयार करण्याची गरजच काय,असा प्रश्न विचारला जात आहे. या परिसरात शाळा असल्याने  हॉकर्स झोन तयार करण्याच्या नियमावलीचे  उल्लंघन करण्यात आल्याचे  मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधी मोहीम सुरू केली होती. परंतु,आता महानगरपालिकेने  राज ठाकरेंच्या घराबाहेर मुद्दाम फेरीवाल्यांना जागा करुन दिल्याचे बोलले जात आहे.

यावर प्रतिक्रिया देताना देशपांडेंनी महापालिका नियमांचे उल्लंघन करत असून त्यांनी आधी फेरीवाल्यांना विचारावे कि त्यांना कृष्णकुंजवळील हॉकर्स झोनमध्ये बसायचे आहे का? कारण आम्ही असे होऊ देणार नाही.कृष्णकुंज बाहेर कोणता फेरीवाला बसतो ते आम्ही बघतोच असा उघड इशारा देशपांडेंनी दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते व्हायब्रेंट गुजरातच्या विश्व संमेलनाच्या नवव्या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या संमेलनाचे आयोजन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुला पाहते रे’चं ‘रॅपचीक’ सॉंग ऐकलंत?

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ सध्या फारच चर्चेत आहे. ते म्हणजे ईशा-विक्रांत यांच्या लग्नामुळे. चाहत्यांनी या दोघांचे अनेक मिम्स,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More