फेरीवाल्यांच्या निवारणासाठी महापौरांची अपिलीय समिती – eNavakal
News मुंबई

फेरीवाल्यांच्या निवारणासाठी महापौरांची अपिलीय समिती

मुंबई – मुंबईत फेरीवाला क्षेत्रांची जाहीर केलेली यादी त्वरित रद्द करण्याचे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. परंतु ही यादी जाहीर करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. परंतु आता महापौर यांच्या अध्यक्षतेखाली अपिलीय समिती गठीत करण्यात येणार असून त्यात नगरसेवक हे सदस्य असतील. या समितीला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चारच दिवसांपूर्वी मंजुरी दिली असून लवकरच ही समिती नियुक्त करण्यासाठी महापौरांकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाला धोरणाची यादी जाहीर करून लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या जात आहेत. मात्र, याला सर्वच नगरसेवकांनी तीव्र विरोध केला असून नगरसेवकांच्या मागणीनुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध केलेली फेरीवाला धोरणांची यादी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु कायदेशीररित्या ही यादी प्रसिद्ध करून लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे ही यादी रद्द करता येत नसल्याचे विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ४३.७०% मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More