फेडरर, नादाल उपांत्यपूर्व फेरीत – eNavakal
क्रीडा विदेश

फेडरर, नादाल उपांत्यपूर्व फेरीत

इंडियाना वेल्स – विक्रमी 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या राफेल नादालने एटीपी इंडियाना वेल्स आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेची पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता हे दोन दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा आमनेसामने या स्पर्धेत येण्याची शक्यता आहे. कारण जोकोविच अगोदरच पराभूत झाला आहे.

चौथ्या फेरीच्या सामन्यात राफेल नादालने सर्बियाच्या फिलीपचा सरळ 2 सेटमध्ये 6-3, 6-4 असा आरामात पराभव केला. सव्वा तासात नादालने ही लढत जिंकली. फिलीप या स्पर्धेत पात्रता फेरीचे सामने खेळून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. नादाल सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून फिलीपला विजयाची संधी दिली नाही. नादालने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. तर या स्पर्धेत आठ वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता नादालचा मुकाबला रशियाच्या कॅरेनशी होणार आहे. कॅरेनने दुसर्‍या सामन्यात जॉन इसनेरचा पराभव केला.  तर पाच वेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या फेडररने ब्रिटनच्या काईलचादेखील सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

नुकतेच आपले 100 वे विजेतेपद मिळविणार्‍या फेडररने काईलवर सहज विजय मिळविला. फेडररच्या आक्रमक खेळासमोर काईलला काहीच करता आले नाही. आता त्याची लढत पॉलशी होणार आहे. पॉलने कॅनडाच्या डेनिसला चुरशीच्या लढतीत तीन सेटमध्ये नमविले. 40 वर्षीय क्रोएशियाच्या कार्लोविचची विजयी दौड अखेर थीएमने रोखली 25 वर्षीय डॉमनिकने सरळ दोन सेटमध्ये कार्लोविचला पराभूत केेले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More