फिक्सिंगला नष्ट करणार; रिचर्डसन यांचा इशारा – eNavakal
क्रीडा विदेश

फिक्सिंगला नष्ट करणार; रिचर्डसन यांचा इशारा

लंडन – ‘स्पॉट फिक्सिंग’ आणि ‘पिच फिक्सिंग’चा दावा करणार्‍या चॅनलच्या प्रतिनिधींची आम्ही भेट घेणार आहोत. फिक्सिंगच्या प्रकरणाकडे अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही. फिक्सिंगची पाळेमुळे उखडून टाकण्यात कुठलीच कसर सोडणार नाही, असा इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी दिला आहे.

कतारमधील अल जजीरा चॅनलने भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संबंधीच्या सामन्यांमध्ये खेळपट्टीबाबत फिक्सिंग झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ‘आयसीसी’ने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे. काही दिवसातच आम्ही संबंधित चॅनलच्या आधिकार्‍यांना भेटणार असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कथित आरोपींपर्यंत जाता येते काय? याचा तपास करणार आहोत, असेही डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले. ते म्हणाले, जेव्हा लोक क्रिकेटच्या फिक्सिंगबद्दल बोलताता, तेव्हा मी चिंतीत होतो. अशा गोष्टींकडे नक्कीच दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे फिक्सिंग प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आम्ही तपास करणार आहोत, असेही रिचर्डसन यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More