फसवणूकप्रकरणी बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर गुन्हा दाखल – eNavakal
News देश

फसवणूकप्रकरणी बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर गुन्हा दाखल

लखनऊ – बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर फसवणूकप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.
एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप आहे. उत्तर प्रदेशातील काटघर पोलीस ठाण्यात सोनाक्षीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तीने एका स्टेज शोसाठी आयोजकांकडून 24 लाख रुपये घेतले होते मात्र, कार्यक्रम केला नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाक्षीला ताब्यात घेण्यासाठी काल उत्तर प्रदेश पोलीस सोनाक्षीच्या मुंबईतील घरी पोहोचले, मात्र ती घरी नव्हती. फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर भादंवि कलम 420 आणि 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. सोनाक्षी बॉलिवूडचे शॉटगन आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. यंदा लोकसभा निवडणुकीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह त्यांचे कुटुंबीय बरेच चर्चेत राहिले होते. भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्यांच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
तर त्यांच्या पत्नीला समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून उमेदवारी दिली होती. यावेळी सोनाक्षी आपल्या आई-वडिलांच्या प्रचारार्थ सभांमध्ये सहभागी झाली होती तसेच आपल्या विधानांमुळे ती अनेकदा चर्चेतही आली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More