फसवणुकी प्रकरणी मासे व्यावसायिकाला अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

फसवणुकी प्रकरणी मासे व्यावसायिकाला अटक

मुंबई- सुमारे पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका मासे व्यावसायिकाला गुरुवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. रघूप्रसाद तिमाप्पा मेकाला असे या 32 वर्षीय आरोपी व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने बुधवार 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फ्लॅटचे बोगस कागदपत्रे बनवून बँक अधिकार्‍याच्या मदतीने हा संपूर्ण घोटाळा झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत देना, युको आणि फुलर्टन बँकेच्या काही अधिकार्‍यांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

संगीता संजय झुनझुनवाला ही महिला अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे त्याच परिसरातील रुषी अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट आहेत. ते दोन्ही फ्लॅट त्यांनी देना बँकेत मॉर्गेज ठेवून 2 कोटी 94 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. मात्र ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी या दोन्ही फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी त्यांच्या परिचित राकेश चक्रवर्ती यांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर राकेशने देना, युको आणि फुलर्टन बँकेच्या काही अधिकार्‍यांच्या मदतीने दोन्ही फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनविले होते. ते दस्तावेज फुलर्टन बँकेत सादर करुन या दोन्ही फ्लॅटवर 4 कोटी 88 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. याबाबत संगीता झुनझुनवाला यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले होते. फ्लॅटवर लोन देताना फुलर्टन बँकेने संगीता झुनझुनवाला यांच्या नावाने धनादेश काढून राकेश चक्रवर्ती यांना दिला होता. त्यानंतर त्याने तिन्ही बँकेच्या अधिकार्‍यांच्या मदतीने युको बँकेत त्यांच्या नावाने एक बोगस खाते उघडून या रक्कमेचा परस्पर अपहार करुन संगीता झुनझुनवाला यांची फसवणुक केली होती. राकेशने एकूण बारा व्यवहार करुन या रक्कमेचा अपहार केला होता. त्यातील एका व्यवहारात रघूप्रसाद मेकाला याच्या खात्यात 59 लाख 8 हजार रुपये जमा केले होते. हा प्रकार संगीता झुनझुनवाला यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More