फसवणुकीप्रकरणी तीन व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल – eNavakal
गुन्हे मुंबई

फसवणुकीप्रकरणी तीन व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

63 लाखांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई  – अपहार आणि फसवणुकीप्रकरणी तीन व्यापाऱ्यांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या तिघांवर एका सोन्याच्या व्यापार्‍याकडून क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे 63 लाख रुपयांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. चेंबूर येथे राहणारे मोहनलाल खिमाजी बोराणा हे सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांचा झव्हेरी बाजार येथे एक सोन्याचे दुकान आहे. तिन्ही आरोपी त्यांच्या परिचित असून गेल्या वर्षी जून महिन्यांत त्यांनी काही व्यापार्‍यांना दागिन्यांची गरज आहे. त्यांच्या दागिन्यांची बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळवून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून जून ते जानेवारी महिन्यांत टप्याटप्याने सुमारे 63 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने क्रेडिटवर घेतले. आठ दिवसांत दागिने किंवा दागिन्यांच्या विक्रीतून आलेली रक्कम जमा करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र सात महिने उलटूनही त्यांनी ही रक्कम दिली नाही तसेच दागिनेही परत केले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना केवळ आश्वासन देत होते. याच दरम्यान मोहनलाल बोराणा यांना तिन्ही आरोपींनी या दागिन्यांची परस्पर विक्री करुन त्यांची फसवणुक केल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी लेखी अर्जाद्वारे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More