फळं आणि भाज्या लवकर खराब होऊ नये, यासाठी काय करावे? – eNavakal
ट्रेंडिंग देश

फळं आणि भाज्या लवकर खराब होऊ नये, यासाठी काय करावे?

लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडणे शक्य नाही. शिवाय कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर जाणे योग्यही नाही. त्यामुळे सतत बाजारात जाणे शक्य नसल्याने घरातील अन्नधान्य, भाज्या, फळे अनेक दिवस ताजी कशी ठेवायची यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

हिरव्या भाज्या अधिक काळ ताज्या ठेवण्यासाठी त्या तशाच फ्रिजमध्ये न ठेवता सुरुवातीला टिश्यूपेपरमध्ये रोल करून मग फ्रिजमध्ये ठेवा.


टोमॅटो लवकर खराब होतो. त्यामुळे त्याचे बारीक काप करून त्यात ऑलिव्ह ऑईल घाला आणि मग फ्रिजमध्ये ठेवा.


कांदा लसूण अशा पदार्थांना सुर्यप्रकाशापासून लांब ठेवा. त्यामुळे कांदा किंवा लसणाला कोंब येणार नाही आणि ते दीर्घकाळपर्यंत टिकून राहतील.


फळं ताजी ठेवण्यासाठी आधी व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर पुरेशी हवा असलेल्या ठिकाणी ठेवा. केळी टिकवून ठेवणं खूप कठीण काम असतं. कारण केळ्यावर काळे डाग पडतात, ती १ ते २ दिवसात खराब होतात. त्यामुळे केल्याच्या वरच्या आडव्या भागाला प्लॅस्टिकने बंद करा. तसेच बटाटे टिकवून ठेवण्यासाठी त्यांनाही पुरेशी हवा असलेल्या ठिकाणी ठेवा.


गाजर टिकवून ठेवायचे असतील तर एल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये गुंडाळून ते फ्रिजमध्ये ठेवा.


सुके कडधान्य आणि डाळी तुम्ही साठवून ठेवू शकता. त्यासाठी हवाबंद डब्ब्यात धान्य टिकवून ठेवण्याची पावडर लावून ते साठवून ठेवा.


दूध किंवा दही जास्त काळ ठेवणे शक्य नाही. त्यामुळे दुधाला पर्याय म्हणून तुम्ही दूधपावडर वापरू शकता.


 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More