फर्ग्युसन कॉलेज कर्मचार्‍यांना आदेश! संघाच्या एनजीओसाठी रक्कम गोळा करा – eNavakal
News महाराष्ट्र

फर्ग्युसन कॉलेज कर्मचार्‍यांना आदेश! संघाच्या एनजीओसाठी रक्कम गोळा करा

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन चालविणार्‍या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने फर्ग्युसन कॉलेजच्या सर्व कर्मचार्‍यांना दुष्काळग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यास सांगितले आहे. ही गोळा केलेली रक्कम स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती या एनजीओला देण्यात येणार आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शरद कुंटे हे संघाशी संबंधित असून पुण्याच्या विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख होते. शरद कुंटे यांचा दावा आहे की, ही मदत गोळा करण्याची सक्ती केलेली नाही. मात्र कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, कॉलेजतर्फे आम्हाला प्रत्येकाला पावती पुस्तके देण्यात येऊन ज्या शब्दांत रक्कम गोळा करण्यास सांगितले. त्यावरून ही सक्तीच असल्याची आम्हाला जाणीव झाली. एप्रिल महिन्यात सर्व प्रोफेसर व कर्मचार्‍यांना एकत्र बोलावून पावती पुस्तकांचे वाटप केले होते. आतापर्यंत 13 लाख रुपये गोळा झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More