फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीला दिलासा नाही- हायकोर्टाने याचिका फेटाळल्या – eNavakal
News मुंबई

फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीला दिलासा नाही- हायकोर्टाने याचिका फेटाळल्या

मुंबई – कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या पीएनबी घोट्याळातील मेहुल चोक्सी याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने आज स्पष्ट नकार दिला. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने सक्तवसुली संचालनालयाने चोक्सीविरोधात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार देताना यासंदर्भातील खटल्यातील साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यासाठी आरोपीने मागितलेली परवानगीही न्यायालयाने फेटाळताना याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली. नव्या कायद्यानुसार आरोपींना दाद मागण्याची फार कमी संधी उपलब्ध आहे. त्यामुळे फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीविरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही. जेणेकरून अशा आर्थिक गुन्हेगारांविरोधातील तपास यंत्रणेच्या कामात अडथळे येतील असे मतही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले. पीएनबी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ज्याच्या विरोधात फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत सुरू असलेली कारवाई सुरू केली. त्या विरोधात चोक्सीने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. ईडीने यासंदर्भात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती द्यावी. ईडीने ज्या साक्षीदारांच्या जबानीवर फरार आर्थिक गुन्हेगार ठरवण्यात आले आहे, त्यांची उलटतपासणी घेण्याची परवानगी द्या अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुरूवातीपासुन ईडीने चोक्सीच्या याचिकेला विरोध केला. चोक्सी हा फरार आर्थिक गुन्हेगार असून अजामिनपात्र वॉरंट बजावूनही तो देशात परत येऊन तपासयंत्रणेपुढे हजर होत नाही. यावरून तो गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्यास आणखी नवा पुरावा कशासाठी हवा? असा दावा केला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More
post-image
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत...
Read More