फणसाड धरणात सारसोर्ली येथील दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू – eNavakal
News महाराष्ट्र

फणसाड धरणात सारसोर्ली येथील दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

मुरुड- रोहा तालुक्यातील सारसोर्ली येथील रहिवासी आसणारे ओमकार गणेश बिरवाडकर (17) व गौरव गणेश बिरवाडकर (14) ही दोन्ही सख्खी भावंड सुट्टी पडल्यामुळे मांडला येथील त्यांच्या आत्याच्या घरी आले होते. आज सकाळी या दोन्ही भावंडासहित नात्यामधील सुमारे 11 जण पोहण्यासाठी फणसाड धरणात गेले होते. सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी हे सर्व पोहून बाहेर येत असतानाच गौरव बिरवाडकर याचा दगडावरून पाय घसरून तो पाण्यात पडू लागला. त्याचवेळी त्याच्या समवेत असलेला त्याचा मोठा भाऊ ओंकार याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात दोघांचाही तोल जाऊन धरणाच्या खोलगट भागात पडले. लहान भावाने मोठ्या भावास मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली. दोघेही पाण्यात बुडाल्याने सोबत असणार्‍यांनी जोरदार आरडा ओरडा केला. येथील ग्रामस्थांनी त्यांना दोन-तीन तासांची शोधमोहिम केली. त्यानंतर त्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. तातडीने त्यांना बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत जगताप यांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेची नोंद रेवदंडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदरची दुर्दैवी घटना घडल्यामुळे मांडला ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

नाशिकच्या मुथूट दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिक – नाशिक पोलिसांनी मुथूट दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपाला सुरतमधून अटक केली असून जितेंद्र बहादूर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More