फडणवीस आणखी ३ महिने ‘वर्षा’ बंगल्यातच राहणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

फडणवीस आणखी ३ महिने ‘वर्षा’ बंगल्यातच राहणार

मुंबई – राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राज्याची सर्व सूत्रे राज्यपालांकडे गेली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या माजी मंत्र्यांनी राहते बंगले सोडण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगला अद्याप सोडलेला नाही. उलट या बंगल्यात मुक्कामासाठी त्यांनी आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांचा मुक्काम तिथेच असणार आहे.

शासकीय नियमानुसार मानवतेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही मंत्र्याला तीन महिन्यांचा अवधी मिळतो. त्यानुसार सध्या फडणवीस यांना वेळ मिळाला असून नवे सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना दुसरे घर पाहावे लागणार आहे. तसेच जर तीन महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि नवे सरकार स्थापन झाले तर नव्या मुख्यमंत्र्यासाठी फडणवीस यांना तात्काळ बंगला रिकामा करावा लागेल.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी करून सर्व मंत्र्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत मंत्रालयातील कार्यालये रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंत्र्यांनी एका दिवसाच्या आतच मंत्रालयातील आपापली कार्यालये रिकामी केली. तर फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयातही शुकशुकाट आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More