प्लास्टिकबंदीच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी – eNavakal
Uncategoriz आघाडीच्या बातम्या मुंबई

प्लास्टिकबंदीच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी

मुंबई – राज्य सरकारने कालपासून प्लास्टिक बंदी लागू करताच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर महापालिकांकडून धडक कारवाई करण्यात आली. प्लास्टिकबंदीच्या पहिल्या दिवशीच कडक दंडात्मक कारवाई केली जात असताना प्लॅस्टिकबंदीच्या दंडात्मक कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेकडून ‘मातोश्री’बाहेर प्लॅस्टिकबंदीच्या दंडाला विरोध करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

राज्यातील प्लास्टिक बंदीचा मनसेने मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी करत दंड वसूलीचा उपरोधिक विरोध करण्यात आला आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याकडून पाच हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. दंड वसूलीऐवजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना वॉटरप्रूफ कापडी पिशवी द्यावी, असे आवाहन या पोस्टरमध्ये करण्यात आले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून मनसेने पर्यावरण मंत्री, महापौर, पालिका आयुक्त आणि नगरसेवकांना प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करुन देण्याचे आव्हान केले आहे.

या’ प्लास्टिकवर होणार बंदी

चहा कप, सरबत ग्लास, थर्माकोल प्लेट, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक (प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी), उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक.

‘या’ प्लास्टिकवर  बंदी नाही

उत्पादनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक आणि थर्माकोल, हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांची आवरणे, प्लास्टिक पेन, दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर), रेनकोट, अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, नर्सरीमध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिक, टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणारे थर्माकोल आणि प्लास्टिक, बिस्कीट, चिप्स अशा पदार्थांची प्लास्टिक आवरणे.

दंड : महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम

२००६ नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी पाच हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी १० हजार रुपये दंडाची तरतूद. तिसऱ्या वेळी पकडले गेल्यास २५ हजार रुपये व तीन महिन्यांची कैदेची तरतूद.

हेल्पलाईनवर साधा संपर्क
प्लास्टिकबंदीबाबत सविस्तर माहितीसाठी मुंबईतील नागरिकांना १८००२२२३५७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More