प्रेमाची परीक्षा! सिद्धार्थ अनुला मागणी घालू शकेल? – eNavakal
मनोरंजन

प्रेमाची परीक्षा! सिद्धार्थ अनुला मागणी घालू शकेल?

मुंबई – प्रेमात काही चूक किंवा बरोबर नसतं. प्रेमाखातर माणूस कुठल्याही आव्हानाला, कुठल्याही परीक्षेला सामोरा जातो. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी कुठलाही त्याग करायला तयार असतो. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेमध्येदेखील सिध्दार्थचा प्रेमाच्या वाटेवरचा प्रवास आता सुरु झाला आहे.

सिद्धार्थ आणि अनुच्या नात्याला अनेक छटा आहेत. सिध्दार्थच्या नकळत अनुबरोबरच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. दुर्गाला हे कळताच तिने अनुला सिध्दार्थच्या आयुष्यातून काढून टाकण्याचे बरेच प्रयत्न केलेबरीच कट कारस्थानं केली पण त्याचा काहीच उपयोग झाली नाही. सानवीनेदेखील अनुला सिद्धार्थपासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी अनुचा चांगुलपणासाधेपणा सिध्दार्थला पटला आणि तो तिच्या प्रेमात पडला. आता सिध्दार्थच्या प्रेमाची खरी कसोटी लागणार आहे कारण अनुवर त्याचं प्रेम आहे हे तो कबूल करणार आहे. याची कल्पना दुर्गाला पहिल्यापासूनच आहे आणि म्हणूनच दुर्गा सिध्दार्थला बजावून सांगते, अनुश्री हवी असेल तर तुला घर, संपत्ती सगळं सोडून जावं लागेल. सिध्दार्थ प्रेमासाठी अनपेक्षित निर्णय घेतो आणि घरसंपत्ती, व्यवसाय सोडून देतो.

ऱ्या अर्थाने आता सिध्दार्थच्या प्रेमाची परीक्षा सुरु झाली आहे. सिद्धार्थ अनुला मागणी घालू शकेल कासिद्धार्थसमोर कुठली आव्हानं येतीलतो त्यांना कसा सामोरा जाईलहे बघणे रंजक असणार आहे. 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More