प्रेमप्रकरणातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या

संगमनेर – संगमनेर ( जि. नगर ) येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या एका युवकाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रमोद संजय वाघ ( वय १७, रा. तिगाव ) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.

संगमनेर येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात प्रमोद संजय वाघ हा युवक बारावीत शिकत होता. शनिवारी ( ता. ६ ) कॉलेजला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र घरी परतला नाही. यानंतर घरातल्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने त्याचे आजोबा भिकाजी कारभारी सांगळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर पोलीस ठाण्यात त्याचे अज्ञाताकडून अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विनी टिळे, हे. कॉ. परमेश्वर गायकवाड, पो. नाईक बाबा खेडकर, लुमा भांगरे यांच्या पथकाने मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे शोध घेत त्याच्या एका अल्पवयीन मित्रास ताब्यात घेत कसून चौकशी केली. शनिवारी ( ता. संगमनेर ) दुपारी फिरण्यासाठी कपालेश्वर डोंगरावर गेले असता  प्रेमप्रकरणातून वादावादी झाल्यानंतर चाकूने भोकसून प्रमोद वाघचा खुन केल्याची कबुली आरोपी मित्राने दिली. आरोपीस घटनास्थळी नेले असता त्याठिकाणी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करीत गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

आईच्या अस्ठीचे विसर्जन करायला गेलेल्या ७ जणांचा बुडून मृत्यू

नांदेड – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आईच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाची वक्रदृष्टी पडली. गऊघाट परिसरात बोट उलटून झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला...
Read More
post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More
post-image
महाराष्ट्र

खासदार राजेंद्र गावितांना शिवीगाळ; ५ जणांना अटक

पालघर – पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित सकाळी जॉगर्स पार्कला मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना काही अज्ञातांनी शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. गावितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी...
Read More