प्रीतम हॉटेलचे मालक कोहलींचे दु:खद निधन – eNavakal
मुंबई

प्रीतम हॉटेलचे मालक कोहलींचे दु:खद निधन

मुंबई – दादरमधील सुप्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली यांचे बुधवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९९८ मध्ये त्यांना मुंबईचे नगरपाल म्हणून मान देण्यात आला होता. कलाकारांशी थेट संपर्क अशी त्यांची ओळख होती.

कुलवंतसिंग कोहली मुळचे रावळपिंडीचे होते. ते अकरा वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब मुंबईत राहायला आले. वडिलांच्या आग्रहाखातर ते हॉटेल व्यवसायात उतरले होते. सुरुवातीला दहा बाय दहाच्या गाळ्यात सुरू झालेल्या प्रीतम हॉटेलला त्यांनी उत्तम प्रसिद्धी मिळवून दिली. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांशी त्यांची घट्ट मैत्री होती. सुरुवातीच्या काळात मुंबईत राहणे त्यांना पसंत नसे मात्र नंतर समुद्र, दादरमधील हिरवागार निसर्ग, मुंबईकरांमधील उत्सवप्रियता यामुळे, ‘मी मुंबईकर झालो’, असे ते कायम सांगत असत. दादरकरांना पंजाबी खाण्याची सवय आम्ही लावली, असेही ते अभिमानाने सांगत असत. कोहली कुटुंबीय मुळच्या सुकामेव्याच्या व्यवसायातले. परंतु त्यांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केल्यावर यामध्येच जम बसवला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More