प्रिया वारियरचा ‘श्रीदेवी बंगलो’ वादात; बोनी कपूर यांनी पाठवली नोटीस – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

प्रिया वारियरचा ‘श्रीदेवी बंगलो’ वादात; बोनी कपूर यांनी पाठवली नोटीस

मुंबई -आपल्या नजरेने देशभरातील तरुणांना घायाळ करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘श्रीदेवी बंगलो’ असे या चित्रपटाचं नाव असून त्यात प्रिया प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘श्रीदेवी बंगलो’ या आगामी चित्रपटात बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचा ती टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

‘श्रीदेवी बंगलो’च्या टीझरमधून हा चित्रपट बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला यावर आधारित असल्याचे दिसून येत आहे. पण या चित्रपटात असा कुठेच उल्लेख नाही की, यामधून अभिनेत्री श्रीदेवीला ट्रिब्यूट दिला आहे किंवा तिच्या मृत्यूवर आधारित हा चित्रपट आहे. तसेच टीझरच्या शेवटी बाथटबमध्ये ज्या प्रकारे पाय दाखविण्यात आले आहेत, यावरुन हा चित्रपट श्रीदेवी यांच्याच आयुष्यावर आधारित असल्याचा अंदाज लावता येतो. त्यामुळे श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी ‘श्रीदेवी बंगलो’चे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीस बजावले. खुद्द प्रशांत मंबुली यांनी याबाबतही माहिती दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More