प्रियंका मोहितेकडून ’माऊंट मकालू’ सर – eNavakal
News महाराष्ट्र

प्रियंका मोहितेकडून ’माऊंट मकालू’ सर

सातारा – येथील गिर्यारोहक प्रियंका मंगेश मोहिते हिने माऊंट मकालू मोहीम फत्ते केली. लहान वयातच प्रियांकाने माऊंट मकालू सर केल्याने ती देशातील युवा वर्गाचे प्रेरणास्थान ठरली आहे. दरम्यान प्रियंकाने आई शोभा यांच्या जन्मदिनीच सॅटेलाईट फोनद्वारे मोहीम पूर्णत्वास झाल्याचे सांगताच आईचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.
किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशी राहणार्‍या प्रियंकाला लहानपणापणासूनच गड, किल्ल्यांचे खूप मोठे आकर्षण होते. तिने आतापर्यंत बंजरपुंछ, बी. सी. रॉय, मेंथोसा, एलब्रुस यासह मामाऊंट एव्हरेस्ट, माऊंट ल्होत्से आदी शिखरे पादाक्रांत केली आहेत. राज्यातील सर्वश्रेष्ठ मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्काराने तिला नुकतेच गौरविण्यात आले आहे. आठ हजार मीटर उंचीच्या 14 शिखरांना गवसणी घालण्याचा निर्धार तिने केला होता. 2 मे रोजी तिने माऊंट मकालू (8485 मीटर उंची) मोहिमेच्या बेस कॅम्पपासून चढाई करण्यास प्रारंभ केला. या मोहिमेसाठी तिने शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी परिश्रम घेतले होते. पायोनिअर अ‍ॅडव्हेंचर कंपनीचे प्रमुख लाप्ता आणि पासांग या दोन शेर्पाच्या मार्गदर्शनाखाली तिने 13 दिवसांत भारताचा झेंडा माऊंट मकालूवर रोवला. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर तिने सॅटेलाईट फोनद्वारे आई – वडिलांशी संपर्क साधला. तेव्हा तिच्या कुटुंबीयांचा ऊर अभिमानाने भरुन आला. तिच्या गिर्यारोहणाच्या प्रवासांत तिला कैलास बागल आणि कर्नल नीरज राणा यांचे मार्गदर्शन लाभले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More