प्रियंका गांधींची ‘गंगा यात्रा’; किनार्‍यावरील लोकांशी संवाद – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

प्रियंका गांधींची ‘गंगा यात्रा’; किनार्‍यावरील लोकांशी संवाद

अलाहाबाद – अखेर काँग्रेसने आपला हुकमी एक्का आणि मुलुखमैदानी तोफ प्रचारात उतरवली आहे. गुजरातच्या गांधीनगरची सभा गाजविल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी या बालेकिल्ल्यात मुसंडी मारणार आहेत. येत्या सोमवारपासून प्रियंका गांधी प्रयागराजवरून वाराणसीपर्यंतच्या ‘ंगंगा यात्रे’वर निघत आहेत. 180 किलोमीटरचा प्रवास ते गंगा नदीतून मोटारबोटीने करणार आहेत.

या गंगा यात्रेत त्या अलाहाबादपासून वाराणसीपर्यंतच्या गंगा किनार्‍यावरील लोकांशी संवाद साधणार आहे. 18 ते 20 मार्च या तीन दिवस चालणार्‍या या तीन दिवसांच्या गंगा यात्रेदरम्यान प्रियंका गांधी या मिर्झापूरच्या विंध्यवासिनी देवीची व वाराणसीत काशी विश्‍वनाथांची पूजा करणार आहेत. या तीन दिवसांच्या ‘गंगा यात्रे’साठी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. या ‘गंगा यात्रे’पूर्वी प्रियंका गांधी प्रयागराज येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. वाराणसीतही 20 मार्चला त्यांचे अनेक कार्यक्रम होणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More