प्रियंका गांधींचा मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रचार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

प्रियंका गांधींचा मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रचार

लखनऊ – काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी तीन दिवसांच्या उत्तरप्रदेशच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात प्रचाराच्या दौर्‍यावर आहेत. प्रयागराज ते वाराणसी असा त्यांचा गंगा नदीतून बोटीद्वारे दौरा असणार आहे. प्रियंका यांनी बडे हुनमान मंदिराला भेट देऊन त्यांनी पूजा केली. त्यानंतर त्यांनी वाराणसी येथील त्रिवेणी संगमावर गंगा पुजन केले आणि बोटीतून मनैया घाट ते अस्सी घाट प्रवास सुरु केला आहे. १४० किमीच्या या गंगा यात्रेत त्या स्टिम बोटने प्रवास करणार आहेत. दरम्यान, या दौर्‍यावर निघण्याआधी काल प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील मतदारांसाठी एक निवेदन वजा पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या राज्याशी माझे नाते फार जुने आहे. तुम्हा सर्वांच्या साथीने इथली राजनिती बदलायची आहे.

प्रियंका गांधी या आज प्रयागराज येथील गंगा-जमूना तटयात्रा करणार आहेत. प्रियंका गांधी या मंदिरामध्ये जाऊन पुजाअर्चा करून रोड शो आणि जाहीर सभाही घेतील. मिर्जापूर येथील मौलाना इस्लामिल चिश्ती मस्जीदलाही त्या भेट देतील. तर बुधवारी पंतप्रधान मोेदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवेश करतील. त्या ठिकाणी लालबहाद्दूर शास्त्री यांच्या निवासस्थानी जाऊन त्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतील. त्या ठिकाणी जैन समाज आणि होलीमिलन कार्यक्रमामध्येही सहभागी होतील. त्यांच्यासोबत 10 गाड्यांचा ताफा असणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बांदिवडेकरांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात

रत्नागिरी – ररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी असलेल्या वैभव राऊतला...
Read More