प्रिन्स हॅरी-मेगन मार्केलच्या रॉयल लग्नासाठी डबेवाल्यांचा आहेर – eNavakal
मुंबई

प्रिन्स हॅरी-मेगन मार्केलच्या रॉयल लग्नासाठी डबेवाल्यांचा आहेर

मुंबई – मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाह सोहळा १९ मे रोजी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यात आता चर्चा रंगली आहे ती मुंबईच्या डबेवाल्यांची. मुंबईच्या डबेवाल्यांनी मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांच्या लग्नासाठी डबेवाल्यांनी महाराष्ट्रीय पद्धतीचा पोशाख पाठवण्याचे नक्की केले आहे. महाराष्ट्रातील लग्नांमध्ये पारंपरिक पद्धतीने जो पोशाख घातला जातो तसाच पोशाख मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल या दोघांना पाठवण्याचे ठरवले आहे. गुरुवारी या पोशाखाची खरेदी करण्यात आली. एवढेच नाही तर मुंबईच्या डबेवाल्यांनी १९ मे रोजी या शाही विवाह सोहळ्याचे सेलिब्रेशन भारतातही साजरे करण्याचे ठरवले आहे. मुंबईमधील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल आणि वाडिया हॉस्पिटल येथे मिठाई वाटून हे डबेवाले राजकुमाराच्या लग्नाच्या आनंदात सहभागी होणार आहेत. त्यामुळे अनोख्या पद्धतीने केले जाणारे हे सेलिब्रेशन नक्कीच खास आहे. १९ मे रोजी होणाऱ्या राजकुमाराच्या लग्नाच्या दिवशी आपले काम करुन डबेवाले हे विशेष काम करणार आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला मॅचेस्टर युनायटेड

पॅरिस – फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला आहे तो इंग्लंड मधील नामंवत ‘मॅचेस्टर युनायटेड क्लब’ इंग्लिश प्रिमियर फुटबॉल स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकावला....
Read More
post-image
क्रीडा मुंबई

डु प्लेसिसची खेळी सर्वोत्तम खेळी होती – धोनी

मुंबई – हैदराबादविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’मधील पहिल्या लढतीत चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवून स्पर्धेची प्रथम अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला. त्यांच्या या विजयात सलामीला आलेल्या डु...
Read More
post-image
क्रीडा देश

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रैना होणार सर्वाधिक धावांचा मानकरी

नवी दिल्ली – यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेनंतर चेन्नई संघाचा डावखूरा फटकेबाज फलंदाज सुरेश रैना सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरणार आहे. हैदबादविरुद्धच्या लढतीत त्यांनी 22...
Read More
post-image
क्रीडा

कोलकाताने केले राजस्थानचे आयपीएलमधून ‘पॅक अप’

कोलकाता – दिनेश कार्तिकच्या कोलकाता संघाने अजिंक्य राहणेच्या राजस्थान संघाचे आज आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतून ‘पॅक अप’ केले. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एलीमिनेटरच्या लढतीत...
Read More
post-image
क्रीडा विदेश

‘अ‍ॅशेस’ मालिकेतील अपयश पुसून काढण्याची इंग्लंडला संधी

लंडन – नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातील ‘अ‍ॅशेस’ मालिकेतील आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील अपयश पुसून काढण्याची संधी यजमान इंग्लंड संघाला उद्यापासून येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू होत असलेल्या 2...
Read More