मुंबई- धकाधकीच्या जीवनात जेवढी दगदग वाढतेय तेवढीच ही मनोरंजनाची भूक वाढत चालली आहे. रसिकांची हीच गरज लक्षात घेऊन झी मराठीने संध्याकाळी मनोरंजनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून दुपारी 1 वाजता प्रक्षेपित होणारी ’जाडूबाई जोरात’ ही मालिका संध्याकाळी 6 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी 6.30 वाजता होम मिनिस्टरपासून सुरू होणार्या या मनोरंजनाच्या यात्रेचा शुभारंभ आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून ‘जाडूबाई’ अगदी जोरात करतील. जाडूबाईने जरी डाएटचा मार्ग स्वीकारला असला तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा हा खुराक कधीही कमी होणार नाही, याची प्राइम टाईम वाढवून झी मराठीने पुरेपूर काळजी घेतली आहे. 27 नोव्हेंबरपासून संध्या. 6 ते रात्री 11 हा संध्याकाळपासून सुरू होणारा प्राइम टाईमचा प्रवास प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल.
