प्रसिद्ध कवी, गीतकार गोपालदास नीरज यांचे निधन – eNavakal
News अपघात आघाडीच्या बातम्या

प्रसिद्ध कवी, गीतकार गोपालदास नीरज यांचे निधन

नवी दिल्ली- ‘अब तो मजहब कोई ऐसा भी चलाया जाए, जिस में इंसान को इंसान बनाया जाए’ अशा शब्दात मानवतेसाठी आपली लेखणी झिजवणारे महान गीतकार, कवी, साहित्यिक पद्मभूषण गोपालदास नीरज यांचे आज संध्याकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. आग्रा येथे सुरुवातीचे उपचार घेतल्यानंतर नीरज यांना काल एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आले नाही.

नीरज यांचे पार्थिव आग्रा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर अलीगढ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती त्यांचे पुत्र शशांक प्रभाकर यांनी दिली. गोपालदास नीरज यांचा जन्म 4 जानेवारी 1925 ला उत्तर प्रदेशच्या इटावामधील एका गावात झाला. लोकप्रिया काव्यासह नीरज यांनी बॉलिवुडच्या चित्रपटांसाठी अनेक लोकप्रिय गाणी लिहिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे भामरागडसह अनेक गावे संपर्काबाहेर

गडचिरोली – मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील परिसरासह शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे भामरागडच्या...
Read More
post-image
देश राजकीय

सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास, पंतप्रधानांना वगळून! राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – भारत-चीनमधील तणावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज टि्वट करून पंतप्रधान मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केवळ देशाचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

नगरच्या पारनेरमध्ये अत्याचारित महिलेच्या १० वर्षीय मुलीला पेट्रोल ओतून पेटवले

अहमदनगर – पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावातून एक थरारक घटना समोर आली आहे. अत्याचार केल्याचा गुन्हा मागे घेत नसल्याने आरोपीने चक्क पीडित महिलेच्या १० वर्षीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील १३ रेल्वेपूल धोकादायक! पालिकेच्या सर्वेक्षणातील माहिती

मुंबई – जुन्या इमारतींचा प्रश्न कायम असतानाच आता मुंबईत जुन्या रेल्वे पुलांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात रेल्वेमार्गावरून जाणारे शहरातील...
Read More
post-image
देश महाराष्ट्र

दीड महिन्यांनी पेट्रोल महागले; डिझेलचे दर मात्र स्थिर

नवी दिल्ली – जवळपास ४७ दिवसानंतर आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १२ ते १४ पैशांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी डिझेलच्या दरात कोणतीही वाढ...
Read More