प्रमोद कांबळे स्टुडिओ आगप्रकरणी राज्य शासन निश्चितपणे मदत करेल- शिंदे – eNavakal
अपघात महाराष्ट्र राजकीय

प्रमोद कांबळे स्टुडिओ आगप्रकरणी राज्य शासन निश्चितपणे मदत करेल- शिंदे

अहमदनगर- शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ हा नगर शहर आणि जिल्ह्यासाठी वेगळा असा ठेवा होता. नगरकरांचा तो अभिमान होता. आगीसारख्या दुर्दैवी घटनेमुळे हा स्टुडिओ भस्मसात झाला असला तरी राज्य शासन निश्चितपणे त्यांच्या पाठिशी असून यासंदर्भात व्यापक दृष्टीकोन ठेवून आणि हा स्टुडिओ पुन्हा उभा राहावा, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असा शब्द राज्याेचे जलसंधारण व राजशिष्ट्राहचार, विमुक्ता जाती, भटक्याि जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्यांण मंत्री तथा जिल्हययाचे पालकमंत्री यांनी शिल्पकार प्रमोद कांबळे यांना दिला.

कांबळे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट बोलणे करवून याप्रकरणी राज्य शासन आपल्या पाठिशी असल्याचा विश्वासही त्यांनी कांबळे यांना दिला. पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी आज दुपारी  श्री. कांबळे यांच्या प्रमोद कांबळे आर्ट स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली. आगीत झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. प्रचंड मेहनतीतून कांबळे यांनी तयार केलेली शिल्पे, मूर्ती, विविध चित्रे, विविध मान्यवरांच्या चित्रांचा संग्रह या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, त्याबद्दल पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आणि श्री. कांबळे यांना धीर दिला. स्टुडिओत असणारा अमूल्य ठेवा नष्ट झाल्याबद्दल त्यांनी कांबळे यांचे सांत्वन केले आणि तुम्ही पुन्हा उभारी घ्याल, असा आशावादही व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री शिंदे यांच्यासोबत प्रा. भानुदास बेरड हे होते. यावेळी प्रमोद कांबळे यांनी स्टुडिओसंदर्भातील विविध बाबींची माहिती पालकमंत्री प्रा. शिंदे यांना दिली. तत्पूर्वी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. आगीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. कांबळे यांच्याकडून स्टुडिओबाबतच्या आठवणी ऐकल्या.  मुंबई सोडून नगर शहरात करियर कऱण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मात्र, सगळा ठेवा नष्ट झाला, अशी कैफियत कांबळे यांनी मांडली. तेव्हा, नगर शहर व जिल्हावासीय या कठीण प्रसंगी आपल्यासोबत असल्याचा आणि राज्य शासन व्यापक दृष्टीकोन ठेवून याकामी तुमच्या पाठिशी असेल, असा विश्वास पालकमंत्री शिंदे यांनी दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More