प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजप उमेदवारांची निवड – eNavakal
निवडणूक मुंबई

प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजप उमेदवारांची निवड

पनवेल – पनवेल महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. यात प्रभाग समिती ‘अ’ मधून अभिमन्यू पाटील, ‘ब’ मधून एकनाथ गायकवाड, ‘क’ मधून दिलीप पाटील व ‘ड’ मधून चंद्रकांत (राजू) सोनी यांनी प्रतिस्पर्ध्यांना मात देत विजय साकारला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काम पाहिले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयानंतर नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आदी सोबत होते. मान्यवरांनी नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

12 हजार ग्राहकांचा पुरवठा आठ तास खंडित

वसई –  महावितरणच्या वसई उपविभागांतर्गत येणार्‍या सातीवली गावातील 22 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या यंत्रणेशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्यामुळे 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चार दिवसांपूर्वी बाधित होऊन...
Read More
post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More
post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More