पिंपरी – प्रदुषणमुक्त पिंपरी चिंचवड शहर आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी सर्वांनी सायकल शेअरींगचा वापर करावा असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट अंतंर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव सायकल चालवून आमदार लक्ष्मण जगताप यांचे हस्ते आज संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
आज महापौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमास आयुक्त तथा पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमीटेडचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे, विठ्ठल काटे, माजी नगरसदस्य विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गटूवार, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, इलू बाइक्स कंपनेच सुनिल जालीहाल व रितेश राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर ते राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव पर्यंत सायकल शेअरींग मध्ये आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक सचिन चिखले, नगरसदस्य विठ्ठल काटे, माजी नगरसदस्य विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आदी मान्यवरांनी सायकल चालवून या मोहमेत सहभाग घेतला. यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकमध्ये या प्रकल्पामुळे भर पडणार असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येला आळा बसेल व नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.