प्रथमेश कदमांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार – eNavakal
महाराष्ट्र

प्रथमेश कदमांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

महाड – भोपाळ येथे आपली सेवा बजावत असताना शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रथमेश कदम याच्यावर आज सकाळी शोकाकुल वातावरणात शेवते येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी ’प्रथमेश कदम, अमर रहे’चा जयघोष केला. आज सकाळी आठच्या सुमारास प्रथमेश याचे पार्थिव शेवते या गावी एका खाजगी रुग्णवाहिकेने आणण्यात आले. शेवते याठिकाणी प्रथमेश कदम याचे पार्थिव येताच त्याच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला. शेवते येथील स्मशानभूमीत भारतीय लष्कराच्या भोपाळ येथील एमईएम युनिटचे सुभेदार मेजर आर.बी.तांबे, हवालदार एस.ए.काशिद , हवालदार अमोल जाधव , मुंबई युनिटचे मेजर नरेश कुमार यांनी प्रथमेशच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. रायगड पोलीस दलानेही प्रथमेशच्या पार्थिवाला सलामी दिली. शोकाकुल वातावरणातच चुलत भाऊ चिराग याने प्रथमेशला अग्नी दिला. 12 मे रोजी भोपाळ येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात बचाव कार्यादरम्यान उच्चदाब वीज वाहिनीचा स्फोट होऊन त्यात प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना 15 मेला मृत्यू झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More