प्रत्येक सीनमध्ये कमी कपडे घालायला सांगण्यात आले- जरीन खानचा आरोप – eNavakal
मनोरंजन

प्रत्येक सीनमध्ये कमी कपडे घालायला सांगण्यात आले- जरीन खानचा आरोप

मुंबई- अभिनेत्री जरीन खान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अक्सर-२’ या सिनेमात दिसली. अभिनयापेक्षा ती आपल्या वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेत येते. आताही तसंच झालंय. तिच्या एका विधानामुळे या सिनेमाचे निर्माते मात्र भलतेच संतापले आहेत. जरीन खानने आपल्याच ‘अक्सर-२’ सिनेमाला अश्लील म्हटले आहे. त्याचे स्पष्टीकरण देताना ती म्हणते, सुरुवातीला निर्माते नरेंद्र बजाज यांनी मला हा एक स्वच्छ सिनेमा असेल असे सांगितले होते. पण नंतर मात्र यातील प्रत्येक सीनमध्ये कमीतकमी कपडे घालायला मला सांगण्यात आले, असा आरोपच तिने केलाय.
जरीन खानच्या आरोपामुळे निर्माते बजाज संतापले असून जरीनला कोर्टात खेचण्याचा विचार ते करू लागले आहेत. ते सांगतात की, या सिनेमाच्या कथानकाविषयी आम्ही तिला आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे आधी वेगळे आणि मग वेगळे असे आमचे धोरण कधीच नव्हते. सर्व काही समजून घेऊनच तिने हा सिनेमा स्वीकारला होता आणि आता आपल्याच सिनेमाला अश्लील ठरवण्याचा ती प्रयत्न करतेय, असे ते म्हणाले. दुसरे म्हणजे जरीन प्रथमच बोल्ड अंदाजात दिसली असंही नाहीय. यापूर्वी ‘हेट स्टोरी-३’मध्येही तिने प्रेक्षकांना लाजून बेजार होण्याची वेळ येईल इतपत अंगप्रदर्शन केले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More