प्रजासत्ताक दिनी मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’ – eNavakal
आंदोलन मुंबई राजकीय

प्रजासत्ताक दिनी मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’

मुंबई – मुंबई प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपाविरोधात विरोधकांची मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे संयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात सर्व विरोधकांच्या वतीने प्रजासत्ताकदिनी मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, सीताराम येचुरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी दिग्गज नेतेमंडळी या रॅलीत सहभागी झाली.
देशातील राज्यघटना बदलण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे विधान आणि गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रजासत्ताक दिनी मुंबईत संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले. ओव्हल मैदानासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते गेट वे ऑफ इंडियासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या पदयात्रेचे संयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राहुल गांधींचे निकटवर्तीय खासदार राजू सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय हार्दिक पटेल, शरद यादव, ओमर अब्दुल्ला, सीताराम येचुरी यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही रॅलीत सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरहेडवर दिनद्याल उपाध्याय यांचे छायाचित्र आहे. एकीकडे भाजप नेते तिरंगा रॅली काढत आहे. दुसरीकडे लेटरहेडवर दिनद्याल उपाध्याय यांचे छायाचित्र वापरायचे. मुख्यमंत्र्यांनी ते कोणत्या विचारधारेचे समर्थन करतात हे आता स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More