मुंबई- मध्य मुंबईतील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार एकनाथ गायकवाड प्रचार सुरू होण्याआधीच कमजोर पडले आहेत. आज ते सकाळी शिवाजी पार्कला गेले होते. त्यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना भेटून ते प्रचार करीत होते. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर झळकत आहे. येत्या 6 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच राज ठाकरे हे कुणाच्या प्रचारसभांना जाणार हेही जाहीर करणार आहेत. मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयासाठी काम करेल, असे राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
