प्रचंड विरोधानंतर सरकारने शैक्षणिक धोरणातून हिंदीची सक्ती वगळली – eNavakal
देश शिक्षण

प्रचंड विरोधानंतर सरकारने शैक्षणिक धोरणातून हिंदीची सक्ती वगळली

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेत येताच नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यात बिगर हिंदीभाषक राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवणे बंधनकारक असल्याची शिफारस करण्यात आली होती. तमिळनाडूतील राजकीय पक्षांनी राज्यांवर हिंदी भाषा थोपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत या मुद्द्याला विरोध केला होता. अखेर तामिळनाडूकडून हिंदी भाषेच्या सक्तीला झालेल्या प्रचंड विरोधानंतर केंद्र सरकारने या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील बिगर हिंदीभाषक राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याची शिफारस वगळली आहे.

‘ज्या विद्यार्थ्यांना ते शिकत असलेली एक किंवा तीन भाषा बदलायच्या असतील, तर ते सहाव्या आणि सातव्या इयत्तेत तसे करू शकतात. त्यामुळे माध्यमिक शाळेत असताना बोर्ड परीक्षांसाठी ते तीन भाषांमधील कौशल्ये (एक भाषा साहित्य पातळीवर) शिकू शकतात,’ असे शैक्षणिक धोरणाच्या सुधारित मसुद्यात म्हटले आहे. त्यापूर्वीच्या मसुद्यात बिगर हिंदीभाषक राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवणे बंधनकारक असल्याची शिफारस करण्यात आली होती. केंद्रातील सत्ताधारी भाजपचा तमिळनाडूतील मित्रपक्ष असलेल्या ‘पीएमके’नेदेखील हिंदी भाषा शिकवण्याच्या सक्तीला विरोध केला होता. हा हिंदी भाषा थोपवण्याचा प्रयत्न असून, ही शिफारस रद्द करण्याची मागणी या पक्षाने केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा मुंबईत दाखल; गोरेगावमध्ये सभेचे आयोजन

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More